Monday, November 2, 2026

एका घरगृहीणीचे मनोगत

 त्यांनी जमवली संपत्ती, वाढवला वैभवाचा थाट,

मी जपला घरातील प्रत्येक नात्याचा हळवा गाठ.

त्यांना दिसला पैसा, पण त्याग कधी दिसला नाही,

घरासाठी जगणाऱ्या मनाची खोलीच  कळली नाही.


नोकरीच्या चौकटीत स्वतःला गुंतवत राहिल्या. 

स्वतःला हुशार म्हणत, मला हिणवत राहिल्या. 

मी मात्र प्रत्येक दिवस नवं काही शिकत गेले,

छंद, कला जोपासून स्वतःला समृद्ध करत गेले.


कमावणं मोठेपणाचं लक्षण असेल कदाचित,

पण घर घडवणं त्याहून मोठी किमया असते.

कारण गृहिणी कधीच कोणापेक्षा कमी नसते, 

ती आपल्या वेगळ्या पद्धतीने श्रेष्ठ असते.


त्या मला कमी लेखत राहिल्या, 

तर मी स्वतःला घडवत गेले...

त्या पैश्यांचे संचयन करत राहिल्या, 

तर मी जगणं साठवत गेले... 


आजही वेळ माझा मित्र बनून सोबत चालतो,

प्रत्येक दिवस नव्या आनंदाचा धडा शिकवतो.

निवृत्तीनंतर काय? हे भेडसावते त्यांना नित्याने,  

मला त्याची चिंता नाही, मी शिकले आहे जगणे.