Wednesday, September 30, 2026

टोपणनावांमागचे गुरुवर्य

शाळेतल्या दिवसांत आम्ही सारे,

शिक्षकांना ठेवती गंमतीदार नावे.

कधी उपहासाने, तर कधी रागाने,

तर कधी अशीच, प्रेमळ भावनेने.


कधी त्यांच्या लंबू उंचीवरून 'बगळा',

कधी त्यांच्या लांब गळ्यावरून 'कोंबडा',

कधी त्यांच्या उर्मठ रागावरून 'मारकुटा',

कधी त्यांच्या खास हसण्यावरून 'राजहंस'.

 

काळ तसाच पुढे सरकत गेला,

करिअर व आयुष्य उंचावत गेला.

तेव्हाच आठवले पुन्हा तेच शिक्षक,

ज्यांनी ठेवला ज्ञानाचा दीप तेवत.

 

शिक्षक मात्र होते तिथेच राहिले,

फळ्याजवळ, त्याच वर्गात उभे.

पण मनात एकच समाधान होते,

माझे शिष्य सारे यशस्वी झाले.

 

आज कालांतराने उमगले सत्य मनात,

त्या टोपणनावांच्या मागे लपलेले दान.

शिक्षकांशिवाय आम्ही काहीच नव्हतो,

त्यांनीच दिला आयुष्याला पाया महान.

Wednesday, September 2, 2026

Encounter

 

                                             Encounter

On a Friday late evening a local train moved quickly on the tracks. The compartments were full of tired office workers and students with their books. People were discussing their weekend plans softly, and the sound of the train filled the air.

Suddenly, a disturbance broke the calm. A man, known in the area for his crimes, leaned toward a young woman sitting by the window. His arrogant smile showed he thought no one would stop him. He tried to touch her, believing the passengers were too scared to act.

One passenger spoke up, asking him to stop. But the man pulled out a big knife and shouted, “Don’t dare to come near me! If anyone interferes, I will kill you!” The crowd became silent, afraid of his threat.

Taking this opportunity, from behind, another passenger pushed him with all strength. The criminal lost his balance, and the knife fell to the floor. Quickly, two passengers pinned him down. Others joined in, holding him tightly. The young woman gave her dupatta, and they tied his hands behind his back. He was trapped and helpless.

Still, he tried to act brave. He shouted warnings, saying the passengers would regret this. But the crowd was angry. Some began hitting him. Seeing their rage, the man begged, “Please, hand me over to the police. Don’t take the law into your own hands.”

Whispers spread among the passengers: “If we give him to the police, he’ll escape again. Bribes, delays… justice will never come.”

The train sped forward, its sound matching the passengers’ anger. Without speaking, they all shared the same thought “iska encounter kar do’….

In one quick move, they dragged him to the door. The wind roared, the tracks blurred below, and with a final push, the man was thrown into the darkness outside.

The compartment became silent. No one cheered, no one smiled. Only heavy breaths and quiet faces remained. Justice had been done in their own way. The train continued, carrying its passengers forward, leaving behind the memory of an encounter that would never be written in official reports, but would stay forever in their minds.

Tuesday, August 25, 2026

शाळेतली ती पावसाची सर

सौंदर्याने तिच्या भाळलो मी पार 

तिच्यावरची नजर हटेल तर शप्पथ 

शाळा सुटली की तिचाच चेहरा 

जिथे तिथे डोळ्यासमोर तरायचा


पुन्हा कधी शाळेत जातो असे व्हायचे 

शाळेला सुट्टी आली की मन हिरमुसायचे 

जोरात पाऊस आला की मुले आनंदाने नाचायची 

पण मी मात्र खिन्न,कारण शाळेला सुट्टी मिळायची 


असाच एक दिवस... 

प्रार्थनेसाठी सगळी मुले मैदानावर 

भिजवून गेली साऱ्यांना पावसाची सर 

तिच्या केसातून ओघळणारं पाणी 

गालावरून घरंगळणारे ते जलथेंब


अहाहा! किती अलौकिक दृश्य होते  

माझं मन तेथे चिंबचिंब भिजून गेले होते

त्याच क्षणी तिची नजर माझ्यावर पडली 

ती लाजली.. मिश्किल हलकंसं हसली


त्या हसण्यात प्रेमाचा शहारा आला 

वाटलं हा क्षण इथेच थिजून जावा 

आमची नजर एकमेकांत गुंफून राहावी 

आणि पावसाची संततधार चालूच राहावी


शाळा सुटली... 

पण तो पाऊस आजही मनात पडतोय 

आणि ती... 

आजही तशीच डोळ्यात भिजतेय

तो पहिला पाऊस

शेवटी एकदाची केली हिम्मत

म्हटले किती दिवस ठेवायचे मन धजत

वर्षभर तिला डोळ्यात सामावून 

मनाला केले शांत समजावून 

धीर धर थोडे दिवस, मग घेऊ बघून


आली श्रावणाच्या पावसाची पहिली सर  

झाली हृदयात जमलेल्या प्रेमाची घर घर 

आसमंतात बहरला मातीचा सुगंध 

मनाने धैर्याने धुत्कारले सारे निर्बंध  


आज पहिल्या पावसाची होती साथ

समोरच होती ती घेऊन डोक्यावर छत्री 

धडाडले माझे हृदय, थरथर आली पायात 

तरी पावलं अनाहूत गेली छत्रीत तिच्याच 


माझी धजती अबोल नजर बोलून गेली 

पावसाच्या सरींनी गुपितं उलगडली 

जरी शब्द निघाले नाहीत ओठांवर,

तरी नजरेने सगळंच सांगून टाकलं 


तो पहिला पाऊस अजूनही आठवतो

आजही मनात तसाच रिमझिम बरसतो

ती न बोलता उमटलेली कबुली आणि 

छत्रीखाली रंगलेली ती  प्रेमाची कहाणी






Sunday, August 9, 2026

तर तू परत आला असतास का रे?

(काल घरी पाळलेला बोका जग सोडून गेला.... )

बोकू, एक दिवस अनाहूतपणे

तू आमच्या आयुष्यात आलास

एवढुसा, छोटासा निरागस जीव

आणि नकळत आमचाच झालास


तू लहान होतास तेव्हा दारातून

घरात घुसण्याचा हट्ट धारायचास  

ना ना करता, शेवटी तूच जिंकलास 

आणि घरातलाच होऊन राहिलास


आम्ही घरात चालताना सारखाच 

आमच्या पायात येऊन चालायचास 

आम्ही धडपडून पडायचा अवकाश 

पण तू मात्र निरागसपणे बघायचास


एकदम शांत, सुस्वभावी—

तुझं वर्णन तरी काय करावं?

ना हट्ट, ना आरडा-ओरडा

ना कधी कोणावर राग धरलास 


तुला हवं असलेलं काही

समोरून काढून घेतलं तरी,

एकही आवाज ना काढता 

ते शांतपणे सोडून द्यायचास 


त्या शेवटच्या क्षणी

मी तुझ्या डोळ्यांत डोळे घालून पाहत होतो

आणि अचानक तुझ्या डोळ्यातून दिसेनासा झालो 

तेव्हा हातातून तू अलगद निसटून गेलास ना रे


आयुष्यभर मला उल्हासित ठेवलंस

माझ्या चेहऱ्यावर हसू फुलवलंस

पण शेवटी मात्र जाता जाता माझ्या 

डोळ्यांत अश्रू देऊनच गेलास ना रे...


निराशेत एकच दिलासा, माझ्या डोळ्यात तरलेले 

अश्रू तुला नाही दिसले, ते अश्रू तुला नाही दिसले

पण जर ते अश्रू तू बघितले असतेस 

तर तू परत आला असतास का रे? 

Wednesday, June 17, 2026

आई, आपण दोघे एकच आहोत का गं?

 आई, तुझ्या पोटी मी जन्मलो, भाग्य माझे थोर,

तुझ्या मायेची सावली, जणू आभाळाचे छत्र थोर.

लोक म्हणतात, मुले घेतात आई-वडिलांचे गुण,

पण माझ्या नसानसांत आहे, फक्त तुझेच ऋण.


तुझं आणि माझं नातं... काय जादू आहे गं यात?

सगळं इतकं तंतोतंत जुळतं की काळीज थरारतं.

मला सर्दी झाली की, तुलाही शिंका येतात,

माझा खोकला, तुझाही घसा ठेवतो खवखवत.

 

माझ्या कपाळावर तापाची लाही चढली की,

तुझं अंगही माझ्यासाठी नकळत होरपळून निघतं.

माझ्या वेदना तुला आधीच कशा कळतात गं आई?

माझं दुखणं तुझ्या हृदयात आधीच ठसठसतं का?

 

कोणी एकच प्रश्न जेव्हा मला आणि तुला विचारते, 

तर कसे बरे त्याला दोघांकडून एकच उत्तर मिळते?

हे विचारांचं सारखेपण मनाला किती उभारी देतं,

हे नातं रक्ताचं नाही, आत्म्याचं आहे हे पटवून देतं.

 

मला आवडतात ग आई, तुझे सारेच्या सारे गुण,

तुझ्याच तस्विरीला नमुन, जगतोय मी रोज उठून.

तुझी विचारसरणी, स्वभाव मला नेहमीच भावतो,

बालपणापासून तुझ्या अस्तित्वाचा, अभिमान वाटतो.

 

हे आयुष्य, सुंदर विचार, सगळं तुझ्यामुळेच मिळाले,

तुझ्याच संस्कारांच्या ऊबेत माझं बालपण बहरले.

कसा फेडू गं आई, तुझ्या या उपकारांचा अनमोल ठेवा,

जन्मोजन्मी मला हिचाच मुलगा कर, हे लक्षात ठेव रे देवा.


........ अविनाश माईणकर 

Sunday, May 10, 2026

आई... ऐक ना माझं,

 

तू सारखी म्हणतेस माझा नंदा गेला

पण मी कधीच गेलो नाही गं आई

मी फक्त शरीर मातीला दिलं पण

आठवणी तुझ्यातच ठेवल्या ना गं

 

आयुष्यभर मला सुखी ठेवण्यासाठी झिजलीस

आता तर खरे मी स्वर्गात खूप आल्हादित आहे

फरक एव्हढाच आहे की मी तुझ्या जवळ नाही

पण मन तर तुझ्या अवतीभवतीच घुटमळतंय गं

 

तुला उब देणारी सकाळची कोवळी किरणे

सायंकाळी येणारा हवेचे शीतल मंद झोके

ह्यातूनच मी येऊन तुझ्या कुशीत सामावतो

दूर नाही, तुझ्या इर्दगिर्दच घिरट्या घालतोय गं

 

रात्री तुझ्या उशीवरचे ओले डाग

ते पाहून मी अगदी गलबलून जातो

रडून रडून काय अवस्था केलीस बघ

सुखात आहे मी, चल आता शांत हो गं

 

                ......अविनाश माईणकर      


Thursday, October 16, 2025

नवीन घरात प्रवेश करतानाच्या आईच्या भावना

चार वर्ष राहिले परक्या भाड्याच्या घरात,

परंतु मन गुंतून राहिले आमच्या जुन्या घरात 

अवती भवती दरवळायच्या जुन्या आठवणी,

भासायचे, आल्या शेजारील इंदू व विमल दारी. 


जणू पद्मनाभची चिमणी उडाली भुर्र्कन 

आणि जाऊन वसली अंबिकाच्या घरट्यात 

ती मोकळी हवा, माणसांचा गजबजाट 

सारे काही जसे झाले इतिहासात गुडूप  


किरायाचे घर होते मोठे आणि छान

पण सतत झुर्रत होते कोंडलेले मन 

मन भरारी घेत राहिले जुन्या घराकडे 

पण पदरी राहिले रोज दिवस मोजणे 


पासष्ट वर्षांनी पुन्हा करतेय तोच गृहप्रवेश 

कात टाकलेल्या नव्या रूपाच्या घरात 

नव्या भिंती आलिंगन देत म्हणत आहेत 

तू आलीस आणि आपले घर झालंय पूर्ण 

Thursday, May 29, 2025

प्रिय आईस

पोटच्या मुलांना आभाळाएव्हढे प्रेम दिलंस

आमचे अश्रू स्वतःच्या डोळ्यात साठवलेस

परंतु आमचे डोळे ओले होऊ दिले नाहीस

स्वतः झिजलिस आणि आम्हाला फुलवलेस


वयोमानाने आता थकलीस तू, असे वाटते 

तरी डोळ्यातील माया अजून तशीच भासते 

मनातील प्रेमाचा जोश व शरीरातील ताकद 

दोघांचाही विरुद्ध दिशेने चालू आहे प्रवास


आजही समोर आल्यावर उत्साहाने उठतेस 

थोड्याच वेळाने ताकद नाही म्हणून बसतेस 

जेव्हा हे सर्व मी बघतो माझ्या डोळ्यासमोर

तेव्हा अनाहूत वाहू लागतात मनात अश्रू झरझर 


तुझ्याशिवाय जीवन, जणू एक रिकामे अवकाश 

तुझ्या अस्तित्वातच घडले माझे अस्तित्व सावकाश 

तुझ्या प्रेमाच्या रोपट्यातून फुललेले मी एक फुल 

पण मनात रोज फुलतं आई तुझ्याच कृतज्ञतेचं फूल


Sunday, May 4, 2025

असेच अचानक वादळ आलं

 

असेच अचानक वादळ आलं,

वृक्षाची एक फांदी कोलमडली.

फांदीवरचे आपलं घरटं थरारलं,

क्षणात सारी स्वप्ने भरकटली.

 

अंधाराने मला संपूर्ण घेरलं होतं.

आजूबाजूला चाचपडलं तर फक्त

माझी दोन बाळे मला बिलगून होती,

बाकी सारं दूरपर्यंत धुरसटच होतं

 

घरट्यातील पणतीची ज्योत विजली होती,

सारे बळ एकवटून एक दृढनिश्चय केला.

डगमगायचे नाही, हार नाही मानायची,

मनाशी चंग बांधला व उजेड तेजत ठेवला.

 

बाळांनो, धीरगंभीर समस्या समोर होती,

नियती जणू काही माझी परीक्षा घेत होती.

निराधार होते तरी तुम्हाला आधार देता देता,

आपोआप स्वतःला आधार मिळत होता.

 

सबळ समर्थ स्वकीयांनी हात पुढे केला,

परिस्थितीशी झुंजत लढत मार्ग काढला.

वाटेत कधी गारवा तर कधी झळ लागली,

पण त्या चटक्यांपासून तुम्हाला दूर ठेवली.

 

स्वमेहनतीने तुम्ही आता सक्षम व सबळ झालात,

पण वयोमानानुसार स्वकीय थोडे दुर्बळ होत आहेत.

कालपर्यंत त्यांनी दिलेल्या आधाराला ठेवून माझ्या लक्षात,

आज त्यांच्या आधाराची काठी बनणे हेच माझ्या ध्यानात.

Wednesday, April 16, 2025

जणू आयुष्यातला आनंदच हरवला

(आपला थोरला मुलगा आनंद अचानक गेला त्या आईच्या मनातल्या भावना) 

माझा आनंद गेला, जणू आयुष्यातला आनंदच हरवला, 
माझ्या कुशीत वाढलेला, आज अनंतात भुर्रकन उडाला. 

 माझ्या आयुष्यात पदार्पण करून, 
 माझे आई बनायचं स्वप्न साकारलंस. 
पण आज तूच असे अचानक जाऊन, 
का रे, मला असे अधांतरी सोडलंस? 

मी आता कोणाला दटावणार? 
व माझ्यावर कोण ओरडणार? 
आपले प्रेमाचे ओरडणे झगडणे, 
सारेच कसे अचानक इतिहास झाले. 

गाढ झोपेत तुझ्या हसण्याचा आवाज येतो. 
मन प्रसन्न होते, चेहेर्यावर कळी फुलते. 
नेमका तेव्हाच माझा हुंदका घात करतो, 
झोप मोडते आणि त्याक्षणीच स्वप्न तुटते. 

तू सोडून गेलास जणू माझे अस्तित्वच शून्य झाले, 
पण मी अजूनही आईच आहे, तुझीच आई आहे. 
तुझ्या आठवणींतच अजून तुझे अस्तित्व जपतेय, 
त्याच ऊर्जेने उर्वरित आयुष्याचे दिवस पुढे रेटतेय. 

आभाळाकडे बघूत आक्रोशून विचारते, 
माझा नंदा मला परत कधी भेटेल? 
परंतु सर्वत्र निःशब्द शांतताच पसरते, 
ऐकू येतात ते फक्त घरंगळणारे अश्रू. 

तेव्हा उमजते माझा आनंद गेला, 
जणू आयुष्यातला आनंदच हरवला

Thursday, April 10, 2025

रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर

 

रिटायरमेंटच्या उंबरठ्यावर

 

बरीच वर्षे हा प्रवास केला, सतत निरंतर न थकता

आयुष्यात स्वप्नांची शिदोरी बांधत चालता चालता

वाटेत शिदोरीतून काही स्वप्ने घरंगळून फुटली

धारातीर्थी झालेल्यांच्या जागी नवीन स्वप्ने बांधली

परंतु कधी ना हिम्मत हारली ना जिद्द सोडली

 

कधी खाच खळग्यात गटांगळ्या खाल्ल्या

कधी उंच पर्वत गाठून उल्हासीत झालो

आभाळ ठेंगणं झाल्याच्या गुदगुल्या झाल्या

तेव्हाच तेथून धरणीच्या मिठीत आलो

 

आता आयुष्याच्या ह्या टप्यावर उभा आहे

मागे वळून बघितले तर कधी स्वतःवरच हसू येते

तर काही आठवणी डोळे ओलेचिंब करतात

शिदोरीतील काही अपूर्ण स्वप्नांनी प्राण सोडलेत

तर काहींनी तग धरून उजेडाची आस धरलीय

 

निवृत्ती हा आयुष्याच्या उत्तरार्धाचा आरंभ,

शेवट नसून जीवनाच्या दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ.

नवा ताजातवाना जोम, हुरूप, जोश एकत्र करण्याचा,

रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरून नवीन सूर्योदय बघण्याचा.

Saturday, September 17, 2022

पण जीवाची खूप भीती वाटते हो !

सोमवारचा दिवस, सकाळी ९ चा सुमार होता.  स्वस्तिक इस्पितळात नेहमीपेक्षा आज जरा जास्तच गजबज होती.  दर सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस म्हणून तशी असतेच. स्टाफ साठी ते काही नवल नव्हते परंतु प्रतीक थोडा बावरून गेला होता.  आज तो प्रथमच पंधराव्या मजल्यावर आईला घेऊन आला होता.  त्याच्या आईची म्हणजे कुसुमताईंची केमोथेरपीची दुसरी अपॉइंटमेंट होती. 

स्वस्तिक इस्पितळाचा स्वतःचा असा एक अजब रुबाब होता.  शहराच्या मध्यभागी वसलेले, संपूर्ण वातानुकूलित,  एकवीस मजल्यांचे उंच, तसेच पसारा एव्हढा मोठा होता कि असलेल्या वीस लिफ्ट्ससुद्धा कमी पडत होत्या.  इस्पितळात प्रवेश केल्यावर वाटेल कि हे पंचतारांकित हॉटेल आहे कि इस्पितळ? त्यात विशाल असे फूड कोर्ट,  गिफ्ट शॉप, तसेच बाहेरगावच्या लोकांना राहण्यासाठी पंचतारांकित खोल्यासुद्धा होत्या. एकंदरीत रुतबाच खूप मोठा!!

त्यांचे कँसर सेंटर उपचारांसाठी खूप प्रसिद्ध होते.  मोठमोठ्या हस्तींचे कॅन्सर तिथे बरे करण्यात आले होते.

कुसुमताईंना दोन महिन्यापूर्वी काखेत दोन मोठ्या गाठी आढळल्या. डॉक्टरांनी निष्कर्ष लावला कि त्या गाठी कॅन्सरच्या असून इलाज म्हणून सहावेळा केमोथेरपीची ट्रीटमेंट करावी लागेल.  पहिल्या केमोच्या वेळी त्यांना तीन दिवस इस्पितळात राहावे लागेल आणि नंतरच्या पाच केमो इस्पितळाच्या 'डे केयर' मध्ये, प्रत्येकी तीन आठवड्यांच्या अंतराने दिल्या जातील.  'डे केयर' म्हणजे तिथे पेशंट फक्त एका दिवसासाठी राहू शकतो.  सकाळी यायचे केमोथेरपी घ्यायची आणि दुपारी किंवा संध्याकाळी जशी ती संपेल तसे निघायचे. डे केयरचे डिपार्टमेंट पंधराव्या मजल्यावर होते.

कुसुमताईंची पहिली केमो तीन आठवड्यापूर्वीच झाली होती.  आज त्यांची दुसऱ्या केमोची अपॉइंटमेंट होती.

मुलाला म्हणजे प्रतीकला घेऊन सकाळी नऊ वाजताच त्या इस्पितळात हजर झाल्या. प्रतिकने फॉर्म, पैसे भरायच्या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या व आईला घेऊन पंधराव्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट पकडली. 

डे केयर एकदम स्वच्छ व नीट नेटके होते.  दहा एक मोठ्या खोल्या होत्या.  प्रत्येक खोलीत सहा बेड्स व्यवस्थित अंतरावर एका बाजूला तीन तर समोरच्या बाजूला तीन असे मांडले होते.  पेशंटला प्रायव्हसी मिळण्यासाठी प्रत्येक बेडला चारही बाजूनी सरकते पडदे लावले होते.  दोन टॉयलेट्स सुद्धा होत्या.   एकंदरीत सर्व व्यवस्थित व मनाला दिलासा देणारे होते.

कुसुमताईंना खोली नंबर १५०१ मध्ये पाठवण्यात आले.  तेव्हा खोलीत कोणीच नव्हते म्हणून त्यांना मनासारखा पाहिजे तो बेड मिळाला.  डॉक्टर साडे दहा वाजता येणार होते व त्यानंतर केमोथेरपी सुरु होणार होती.

इतक्यात खोलीत एक पन्नाशीची बाई आली. सुधृद तसेच सुसंकृत, घरंदाज दिसत होती.  व्यवस्थित नेसलेली साडी, गळ्यात जाड सोन्याचे मंगलसूत्र, कपाळावर गोल मोठे कुंकू. एकदम सराईतासारखी खोलीभर फिरली, टॉयलेट मध्ये जाऊन सगळे बघितले.  एका दोघा नर्सेसना वरच्या आवाजात नावाने हाक मारली. दोघ्या तिघ्या नर्सेस धावत पळत आल्या, तिला बघून खुश झाल्या व गप्पा मारू लागल्या. त्या सगळ्या इस्पितळाच्या गॉसिप मध्ये मग्न झाल्या. ताज्या अपडेटची देवाण घेवाण सुरु झाली.

गप्पांच्या ओघात त्या बाईचे नाव राधा आहे हे कळले. बोलत बोलत राधा एका खिडकीच्या कडेवर टेकून बसली आणि बाकी सगळ्या तिच्या आजूबाजूला उभ्या राहिल्या.  ज्या गप्पा चालल्या होत्या त्यावरून राधा युनिअन लीडर वाटत होती.  एकदम कडक आवाजात सगळ्यांशी बोलत होती व बाकी सगळ्या आपापल्या व्यथा तिच्या समोर मांडत होत्या.

प्रतीकला आधी वाटले कि त्यांच्या मोठ्या आवाजात बोलण्याची तक्रार करावी.  परंतु त्याने विचार केला कि स्टाफशी कशाला पंगा घ्या, नंतर दिवसभर त्याच बायका आईची देखभाल करणार होत्या. कुसुमताईंनी सुद्धा डोळे वटारून त्याला गप्प राहण्याचा इशारा दिला आणि त्यात आत्तापर्यंत आलेले पेशंट तर काहीच बोलत नव्हते तर आपण कशाला बोलावे? म्हणून तो गप्प सगळे बघत बसला होता.

थोड्या वेळाने त्या सगळ्या गेल्या पण राधा मात्र काहीश्या गंभीर विचारात मग्न होऊन खिडकीच्या कडेवरच बसून राहिली.

पाच एक मिनिटं झाली असतील, तेव्हढ्यात राधाचा फोन वाजला आणि ती दचकली जणू काही तिची समाधीच भंग पावली.  फोन उचलल्या उचलल्याच समोरच्याला जोर जोरात ओरडू लागल्या.  थोडी बोलाचाली झाल्यावर तिने पलीकडच्याला एकदम जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. 

इकडे प्रतीक व कुसुमताई एकदम चरकलेच.  आता राधा त्यांना युनिअन लीडर सोडून कुठल्या तरी टोळीची म्होरकी वाटायला लागली.  रस्त्यांचा खड्ड्यांचे सुधारीकरण करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा फोन असावा.  सगळ्या गल्ल्यांची नावे घेत त्यावरील खड्ड्यांची संख्या सांगत खूप झापले त्याला.

तो फोन ठेवल्यावर राधाने पोलीस स्टेशनला फोन लावला आणि त्यांना सुद्धा मोठमोठयाने ओरडू लागल्या.  “इकबालची गुंडगिरी खूप वाढली आहे भावे नगर मध्ये.  नागरिकांनी अजून किती तक्रारी करायच्या तेव्हा तुम्हाला जाग येणार?  तुम्हाला पैसे देऊन गप्प केलेय कि तुम्हालाही त्याची भीती वाटते?  नक्की काय ते सांगा नाही तर मलाच येऊन त्याला संपवायला लागेल.  वेळ पडली तर त्याचा काटा काढायलाही मागे पुढे बघणार नाही. मग बसा तुम्ही पंचनामे करत. मला फरक नाही पडत. अगोदरच माझ्यावर सहा केसेस कोर्टात लागल्या आहेत त्यात सातवीची भर पडेल.  पण मी कोणाची गुंडगिरी खपवून घेणार नाही. खून करून टाकेन त्याचासुद्धा.”

इकडे प्रतिकने न राहवून खोलीच्या बाहेर जाऊन स्टाफशी चौकशी केली कि ह्या राधाबाई कोण आहेत.  सगळ्यांनी हळू आवाजात त्याला बजावले कि तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस आणि काही बोलायला तर बिलकुल जाऊ नकोस.  एकदम टेरर बाई आहे ती.  मोठमोठे गुंड तिला बघून थरथर कापतात, म्हणतात एकवेळ मृत्यूचा मुकाबला करणे सोपे आहे पण ह्या बाईचा सामना करणे नको.

प्रतीक गपचूप येऊन आईच्या बेडच्या बाजूला येऊन राधा कडे पाठ फिरवून बसला.  मनात म्हणाला ह्या बाईपासून लांबच राहिलेले बरे. तसेच स्वतःच्या पाठी काय कमी व्याप नाहीत. आधीच तो कुसुमताईंच्या आजाराला घाबरलेला होता.

इतक्यात राधाने एका नर्सला ओरडून पाणी आणायला सांगितले.  ती सुद्धा दबकतच पाणी देऊन गेली.  थोडी शांतता झाली.  प्रतीकला वाटले आता राधा निघून जाईल आपल्या ड्युटीवर, पण ती काही हलेना.

थोड्या वेळाने म्हणजे पंधरा मिनिटानंतर डॉक्टर खोलीत आले.  समोरच त्यांना राधा दिसली व तसेच  ते तिच्यापाशी जायला लागले.  राधाने सुद्धा जसे त्यांना बघितले तसेच खिडकीजवळच्या बेड वर झेप घेतली व स्वतःवर चादर ओढली.  

डॉक्टर मिश्किलीने बोलले, "काय राधाताई कशी आहे तब्येत?"

डॉक्टरांच्या ह्या प्रश्नाने खोलीतील पेशंट्सना कळले कि राधासुद्धा एक पेशंट आहे.  त्यांच्यासाठी हे कळणे सुद्धा एक धक्काच होता. म्हणजे राधाला सुद्धा कॅन्सर झाला होता!

राधा हळू आवाजात बोलली कि अधून मधून पोटात दुखते, बाकी ठीक आहे.

डॉक्टर म्हणाले, "दिसतेच आहे.  एव्हढ्या जोरात सगळ्यांची झाडंपट्टी चालू आहे तुमची सकाळ पासून.  मला सगळं रिपोर्टींग होते. तिसरी केमो आहे ना आज?  पण तुमचे खणखणीत झापणे काही कमी झाले नाही."

राधा सकाळपासून पहिल्यांदाच ओशाळल्याचे सर्व पेशंट्सनी बघितले. तिचे हे रूप सर्वानाच नवे होते.

डॉक्टर म्हणाले, "राधाताई, किडनीच्या कॅन्सरला बरा करायला थोडा वेळ लागतोच.  औषधे ठरवलेल्या वेळात न चुकता घेत राहा. आहारातील तिखट आणि अल्कोहोल एकदम थांबवा. काही काळजी करू नका.  लवकरच बऱ्या व्हाल तुम्ही."

त्यावर राधा विचलित होऊन म्हणाली, "हे सगळे बरोबर आहे डॉक्टर, पण जीवाची खूप भीती वाटते हो!!"