चार वर्ष राहिले परक्या भाड्याच्या घरात,
परंतु मन गुंतून राहिले आमच्या जुन्या घरात
अवती भवती दरवळायच्या जुन्या आठवणी,
भासायचे, आल्या शेजारील इंदू व विमल दारी.
जणू पद्मनाभची चिमणी उडाली भुर्र्कन
आणि जाऊन वसली अंबिकाच्या घरट्यात
ती मोकळी हवा, माणसांचा गजबजाट
सारे काही जसे झाले इतिहासात गुडूप
किरायाचे घर होते मोठे आणि छान
पण सतत झुर्रत होते कोंडलेले मन
मन भरारी घेत राहिले जुन्या घराकडे
पण पदरी राहिले रोज दिवस मोजणे
पासष्ट वर्षांनी पुन्हा करतेय तोच गृहप्रवेश
कात टाकलेल्या नव्या रूपाच्या घरात
नव्या भिंती आलिंगन देत म्हणत आहेत
तू आलीस आणि आपले घर झालंय पूर्ण
सुंदर
ReplyDelete