मी भारत देशाचा एक सर्व सामान्य नागरीक आहे जो समाजात होत असलेल्या अन्यायाने संतापतो, धगधगतो आणी थोड्याच वेळात थंड पडतो. काही क्षणासाठी स्वतःला चवताळलेला
वाघ समजतो आणी काही क्षणासाठी स्वतःला नपुंसक म्हणायला शरमतो. उदासीन म्हटले तर थोडे बरे वाटते. नक्की 'मी' कोण आहे हा विचार सारखा मनाला सतावत असतो.
खरे तर मी भ्याड झालो आहे. स्वतःचा मुळमुळीतपणा झाकायला सुशिक्षितपणाची चादर ओढतो; म्हणतो कि लढाया व झगडा हे काही सुशिक्षितपणाचे लक्षण नाही वा काम नाही. पण हाच अन्यायाविरुद्धचा झगडा चंदेरी पडद्यावर एक नायक करताना बघतो तेव्हा माझे मन खूप उड्या मारते, मी जोर जोरात टाळ्या वाजवतो आणि चित्रपटाला यशस्वी करतो. थोडक्यात मनाला थोडी शांती मिळवण्यासाठी चित्रपटाची तिकिटे विकत घेतो आणी निर्मात्याचे खिशे भरतो. चित्रपट संपला कि मी आहे तिकडेच.... मुळमुळीत.....
असेच दिवस जात असताना कोणी 'अण्णा हजारे' भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन पेटवितात तेव्हा माझ्या मनातला अंगार सुद्धा धग पकडतो. मन भारावून जाते, काय करू काय नको ते कळेनासे होते. मन भरारी घेते आणी दिल्लीकडे धावू लागते पण शरीर तिथेच क्षब्ध असते, दुसऱ्या क्षणी वाटते आझाद मैदानावर भ्रष्टाचार निषेध मेळावा भरवून आणावा पण राज्यकर्ते परवानगी देणार नाही असे म्हणून थांबतो, तिसऱ्या क्षणी विचार करतो कि घरासमोरच्या चौकात उभा राहून अण्णांच्या समर्थनात व राज्यकर्त्याच्या मस्तवालपणाच्या विरोधात आपले जळजळीत विचार मांडून समजात क्रांतीची बीजे पेरवावीत पण बायको खुळ्यात काढते म्हणून तिला माझी कदरच नाही असे पुटपुटत आवरते घेतो. असे बरेच स्फूर्तीने फुरफुरलेले विचार येतात आणी जातात मग शेवटाला दूरदर्शनसंचासमोर बसतो, खाऊन पिऊन भर पोटावर ढेकर देत, तंगड्या वर करून आडवा होतो आणी अण्णांच्या आंदोलनात सामील होतो.
मी बऱ्याच जणांना बघितले आहे जे घरात बायका मुलांपुढे जोर जोरात आरडा ओरडा करत असतात पण एकदा घरा बाहेर पडले कि भिगी बिल्ली बनून फिरतात. बायको कधीतरी वैतागून बोलते कि जेवढी बहादुरी आमच्या समोर दाखवता ना त्यातली थोडी तरी बाहेरच्या जगात दाखवा. तो नाक्यावरचा मवाली माझ्याकडे वाईट नजरेने बघतो ना, त्याला जाऊन जाब विचारा. तिकडे तर काही चालत नाही. तेव्हा तोच पुरुष जोरात उत्तर देतो, "मी काही मवाली आहे का, कोणा मवाल्याच्या तोंडी लागेन? मी एक सुशिक्षित माणूस आहे, रस्त्यावर मारामारी करणारा गुंडा नाही." बायको मनातल्या मनात पुटपुटते कि हल्लीच्या जगात काही लोक शंढपणाला 'सुशिक्षित' म्हणायला लागलेत. असो!!
समाजात कायदे कानून धुडकावून मस्तवालपाणे वागणारी माणसे व त्यांच्याकडे काणा डोळा
करणारी कायदा सांभाळणारी माणसे बघून तर मनात अंगार धगधगतो, असे वाटते की दोघांच्या बखोटीला पकडून जाब विचारावा कि काय हा अतिरेक मांडला आहे? ह्या मंडळीनी जणू काही सामान्य माणसाला समाजातून वजाच केला आहे. ज्याच्या सुरक्षेसाठी, ज्याचे आयुष्य सुखदायक करण्यासाठी सरकारने कायदे कानून बनवीले त्याच सामान्य माणसाची ह्यांनी नगण्यात गणती केली!
परवाचीच गोष्ट आहे, साधारण सकाळी अकरा वाजण्याचा सुमार होता. मी गोरेगावच्या सबवेतून पश्चिमेच्या दिशेला बाहेर पडलो. समोर पाणपोहीच्या दोन्ही बाजूला रस्ता माणसांनी गजबजून गेला होता. काम महत्वाचे होते व तसेच ठरल्या जागी पोहोचन्यासाठी वेळही थोडाच उरला होता, म्हणून पाठी फिरणेही शक्य नव्हते . जास्त विचार न करता मी पुढे पावूल टाकले. थोडा पुढे गेलो असता आढळले कि अर्धा अधिक रस्ता फेरीवाले आणी भाजीवाल्यांनी व्यापून टाकला होता. उरलेल्या रस्त्यावरून रिक्षा,गाड्या व माणसे एकामेकाला सांभाळत पुढे सरकत होती.
रस्त्याच्या उजवीकडच्या बाजूच्या फुटपाथवर ठेवलेले त्यांचे सामान आणी बाजूचे गटार सांभाळत, मिळेल त्या जागी पाय ठेवून उड्या मारत आगेकूच करायला मी सुरुवात केली. दोन चार उड्या मारल्यावर दिसले कि रस्त्याच्या डावीकडे मुन्सीपालीटीची 'सामान जप्त करणारी गाडी' उभी होती व त्याच्या अलीकडे पोलिसांची जीप उभी होती. मला हे काही बघवले नाही, मनात राग भरायला सुरुवात झाली, एकीकडे पुढे सरकायला जागा नाही म्हणून सगळी माणसे, रिक्षावाले, गाडीवाले वैतागले आहेत आणी दुसरीकडे मुन्सीपालीटीची गाडी शांतपणे उभी आहे आणी तिसरीकडे पोलीस काहीच हालचाल न करता गाडीत बसले आहेत. ह्यांना असे वाटत असावे कि आम्हाला कोण जाब विचारणार?
मी पोलिसांच्या गाडी ओलांडून जात होतो एवढ्यातच एक हवालदार जणू नुकताच कोणाला तरी भेटून जीपमध्ये शिरत होता. मनात खूप आले कि मी त्याला पकडून विचारावे कि हे सर्व काय चालले आहे? पण पावले नकळत पुढेच पडत होती. मनात द्वंद्व पेटले होते. थांबावे कि नेहमी प्रमाणे काणा डोळा करून निघून जावे. पण नंतर वाटले आत्ताही गुमान पुढे गेलो तर मनातला जळफळाट अजून वाढत राहील आणी मी स्वतःला माझ्या मुल्मुळीतपणा बद्दल माफ करू शकणार नाही. म्हणून ह्या वेळी मनाला धीर देत पुढे सरसाववलो व त्याला विचारले, "साहेब, बघा हा रस्ता फेरीवाल्यांनी एवढा व्यापला आहे कि माणसाना चालायला जागा उरली नाही." त्या हवालदाराने चमकून मागे वळून बघितले. त्याच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटले होते. तरीही मी पुढे रेटले, "आणी हे सर्व तुमच्या आणी मुन्सीपालीटीच्या गाडीच्या उपस्थितीत!!" तो काही बोलणार एवढ्यात मागच्या सीटवर बसलेल्या त्याच्या साहेबांनी मला हात दाखवत, ठीक आहे अशी मान हलवत पुढे जायचा इशारा केला आणी नकळत माझ्या पायांनी पुढे चालण्यास सुरुवात केली.
माझे बोलणे म्हणजे समुद्रात पडलेल्या एका थेम्बासारखे होते हे मला कळत होते तरीही मनाला थोडी शांती झाली होती.
मी जेव्हा हि घटना माझ्या बायकोला सांगितली तेव्हा तिने तर मला उलटे खडसावलेच, म्हणाली कि तुझे नशीब बलवत्तर म्हणून त्या हवालदाराच्या साहेबाने शांतपणे घेतले दुसरा कोणी असता तर पहिली तुझ्या कानाखाली पेटवली असती आणी हाकलवून दिले असते अथवा खोटी केस करून अडकवून टाकले असते. मग आमची काय परिस्थिती झाली असती ह्याची काही जाण आहे कि नाही? पुन्हा कधी असा शहाणपणा करायला जाऊ नकोस. स्वतःला टारझन समजतोस कि काय? एवढ्या मोठ्या जमावात बाकी कोणाला काहीच वाटले नाही आणी फक्त तुलाच एवढा त्रास झाला कि त्यांच्या तोंडी लागलास?
मला एका क्षणासाठी कळलेच नाही कि हीच का ती जी मला मुळमुळीत म्हणून हिणावते आणी आज पहिल्यांदा थोडी बहादुरी दाखवली तर वरती मलाच घाबरवते!!
आज जेव्हा मी मागे वळून त्या घटने कडे बघतो तेव्हा मला कळते कि माझ्या बहादुरीने कोणताच फरक पडला नव्हता. नाही त्या हवालदाराला का त्याच्या साहेबाला किंवा त्या मुन्सीपालीटीच्या गाडीवाल्यांना का त्या फेरीवाल्यांना!! सर्वात जास्ती दुखद म्हणजे तिकडे नेहमी होणार्या गर्दीला तर बिलकुलच नाही.
फरक फक्त एकाच माणसाला जाणवला तो म्हणजे मीच कि ज्याला बायकोचे चार शब्द ऐकायला लागले.

It is an excellent introspection. Many wont agree with it openly but deep inside everyone would relate to it.
ReplyDelete